
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रम्हपुरी:-आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने स्थानिक अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे १ जुन २०२२ ला महिला, नागरिक, शिवप्रेमी व शिवसैनिकांना मोफत दाखविण्यात आला.यावेळी अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका चंद्रपूर, प्रा.अमृत नखाते शिवसेना उपजिल्हाप्रमुख चिमूर विधानसभा क्षेत्र, भाऊराव ठोबरे चिमूर विधानसभा समन्वयक यांनी केले. प्रसंगी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, स्वर्गीय आनंद दिघे अमर रहे, जय भवानी जय शिवाजी आदी. घोषणा देत, सिनेमागृह प्रवेश केला.
यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील भिसी, पुयारदंड, आंबोली, गडपिप्री, तसेच नागभिड तालुक्यातील नागभीड,नवेगाव पांडव, कोर्धा, रांनपरसोडी, गोवरपेठ, मेंढा, तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव,सोंदरी, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, नान्होरी, खरबी, माहेर व ब्रह्मपुरी शहरातील अनेक वॉर्डातील महिला, नागरिक तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचे मोफत प्रदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते, डॉक्टर रामेश्वर राकडे शिवसेना उपतालुका प्रमुख ब्रह्मपुरी, केवळराम पारधी शिवसेना उपतालुकाप्रमुख ब्रह्मपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख, गुड्डी वहारे माजी शहरप्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य रसिका मैद, श्रीमती कुंदा कमाने उपतालुका संघटिका, मोरेश्वर अलोने विभाग प्रमुख, गुलाब बागडे विभाग प्रमुख, बालू सातपुते शिवसेना तालुकाप्रमुख चिमूर, बंडू भाऊ पांडव उपतालुकाप्रमुख नागभीड, गुड्डू नावघडे विभाग प्रमुख, राजेंद्र जाधव विभाग प्रमुख यांनी केले.