
जागतिक पर्यावरण दिन तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिमूर तालुका काँग्रेस व पर्यावरण विभाग तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – दिनांक. ५ जुन रोजी तालुका कांग्रेस पर्यावरण विभाग व तालुका कांग्रेस , शहर कांग्रेस चिमुर यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे वाढदिवस तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इंदिरा गांधी चौक चिमुर येथे डॉ.सतिषभाऊ वारजुकर यांच्या सूचनेनुसार तालुका अध्यक्ष पर्यावरण विभागाचे प्रदीप तळवेकर यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संजय घुटके , शहर अध्यक्ष अविनाश अगडे ,शहर संपर्क प्रमुख धनराज मालके , मा.ता.अध्यक्ष अनुसूची जाती विभागाचे विनोद राऊत मा.बांधकाम सभापती अ. कदिरभाई शेख (चाचा) , मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख , तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर , युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौतम पाटील , विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे ,मुरपार पं.स. सर्कल प्रमुख आकाश श्रीरामे , दिलीपजी राचलवर , मोहनजी करंडे, इत्यादी उपस्थित होते.