
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
बल्लारपूर:-बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे महिला पोलिस कर्मचारी मोनल मेश्राम यांच्या टू व्हीलर दुचाकीला राजुरा येथील मुख्य महामार्गावर मागुन येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी ६:४० वाजताच्या सुमारास घडली,
प्राप्त माहिती अशी की महिला पोलिस मोनल मेश्राम नामक कर्मचारी आपले कर्तव्य बजावून MH-34 AT- 1877 क्रमांकाच्या मायस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर वरुन राजुरा येथील आपल्या राहत्या घरी परत येत असताना मागाहून येणाऱ्या आयशर MH-29 BE-4158 क्रमांकाच्या ट्रक ने धडक दिली असता, धडक बसताच महिला पोलिस यांचा आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत.