
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वर्धा:-दिनांक 13/06/2022 ला झालेल्या सावली (सा.) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था र. न.97 च्या निवडणुकीत अध्यक्ष पदी दामोधर पांडुरंगजी वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सहकार गटाचे पुंडलिक पांडुरंग जी गुळघाणे निवडून आले, निवडणूक अधिकारी म्हणून जी. एन. ढेपे मॅडम यांनी काम पहिले तर त्यांना चैताली नांदुरकर आणि संस्था सचिव डी. एन. कोठेवार यांनी सहकार्य केले.
संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य वैभव सुधाकर अवचट, वासुदेव आनंदराव सिद, जगन दमडुजी चौधरी, पुंडलिक पांडुरंगजी गुळघाणे, दामोधर पांडुरंगजी वाघमारे, जगदीश कुशाबराव कलोडे, अलका पुंडलिकराव चांभारे, भगवान भाऊरावजी धानोरकर, संदीप मोतीरामजी शिंदे,मोतीराम भाऊराव वाघमारे, अंकुश नारायण तिमांडे नलू पुरुषोत्तम मुंगले, दुर्गा हरिषचंद्र कांबळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रामदासजी कडु, सुधीर वाघमारे, भूषण झाडे, पुंडलिक चांभारे, राजूभाऊ बोरकर, विलासराव गुळघाणे, अनिलराव गेडाम, अरुणराव बोरकर, जगनराव चांभारे, श्रीरामजी गुळघाणे, किसनाजी कडु, गजाभाऊ बालपांडे, निलेश गेडाम उपस्थित होते.सहकार नेते सुरेशभाऊ देशमुख व शरदभाऊ देशमुख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.