Breaking News

मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध

नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहिर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी १३ जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.

१२ मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आले. त्यानंतर ३१ मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यानंतर १ जून ६ जून पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. २०११च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४,४७,४९४ एवढी असून यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,८०,७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,८८,४४४ एवढी आहे. नागपूर शहराची ५२ प्रभागामध्ये विभागणी करून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सदस्यसंख्या १५६ एवढी आहे. यापैकी ५० टक्के अर्थात ७८ जागा महिलांसाठी राखीव ठरलेल्या आहेत. अनुसूचित जातीकरिता एकूण ३१ जागा आरक्षित असून त्यातील १६ जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत. अनुसूचित जमातीकरीता १२ जागा राखीव असून त्यापैकी ६ जागा महिलांकरिता राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 113 जागा असून त्यातील 56 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved