जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत विविध प्रभागात नाल्या नसल्यामुळे गढुळ पाणी जनतेच्या घरात घुसले अशी माहिती जनतेने फोनद्वारे दिली असता तात्काळ तालुका काँग्रेस चे अध्यक्ष ,आणि शहर काँग्रेस चे अध्यक्ष यांनी घेतली, दखल स्वतः आपले पदाधिकारी व कार्यकर्ते बोलावून नगर परिषदेला घेराव केला, आणि निवेदन देऊन प्रशासनाला तात्काळ नियोजन करण्यात आले,
नगर परिषदचे अधिक्षक प्रदीप रानकांब यांनी आपले कर्मचारी यांना सोबत दिले असता त्यांनी चोकाशी करून नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांना सूचना दिली, ते सुध्दा तात्काळ स्वतः आले परिस्तिथी पाहिली आणि P W D चे अभियंता समीर उपग्लावार यांना बोलावून जे,सी,बी, बोलावून पाण्याचा मार्ग काढून दिले,
यावेळी तालुका अध्यक्ष संजय घुटके, शहर अध्यक्ष अविनाश अगडे , मिडिया प्रमुख पप्पु भाई शेख , युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव , गौतम पाटील, विधानसभा उपाधयक्ष नागेंद्र चट्टे ,प्रदीप साटोने , महिला काँग्रेसच्या सचिव वनिताताई मगरे ,व ग्रामवाशी महिला व पुरुष इत्यादी उपस्थित होते.