
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सोनेगाव वार्डातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे, गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांकडून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे,मात्र याकडे कोणत्याही नगरसेवकानी तसेच नगरपरिषद प्रशासनानी मुळीच दखल घेतली नाही,
त्यामुळे हल्ली पावसाळ्यात पाऊसाचे पाणी खड्ड्यात साचून चिखल निर्माण झाले आहे. जागोजागी खड्डेच – खड्डे पडले आहेत, वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, भारतीय क्रांतिकारी संघटनेचे तालुका संघटक प्रमुख कैलाश भोयर यांनी नगर परिषदेला सोनेगाव वार्डातील रस्त्याची दुरूस्ती करून खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी केली आहे,
नगर परिषदेने तातडीने रस्त्याची मरम्मत करावी अन्यथा भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा कैलाश भोयर यांनी यावेळी दिला.