Breaking News

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक जण मोबाईलच्या अधिन झालेले आहेत. मोबाईलमुळे अवघड असणारे काम सोपे झाले आहे. त्याचा उपयोग चांगल्या व ठराविक कामांकरिता करावे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी योग-प्राणायाम, विविध गोष्टी, स्मरण शक्ती क्रिडा प्रकारच्या माध्यमातून विकास होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर नातेवाईक -भारतीय संस्कृती, विविध संस्काराचे धडे देण्यासाठी आणि राष्ट्र निर्मितीची संकल्पना साकार करण्यासाठी अशाप्रकारे संस्कार शिबिर महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन दादाजी धुनिवाले देवस्थान पंचकमेटीचे संचालक प्रतिकुमार टांगले यांनी केले. ते भिलेवाडा येथे दादाजी धुनिवाले मठात संस्कार चळवळ व गांधी विचार मंच भंडारा, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेन भंडारा यांच्या वतीने आयोजित सात दिवशीच संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

शिबिर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये होते. प्रमुख पाहुणे म्हणून दादाजी धुनिवाले देवस्थान पंचकमेटीचे संचालक प्रतिकुमार टांगले, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, खोकरला येथील ग्राम पंचायत सदस्य सुरेश घोडे, संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशनचे संचालक समीर नवाज, धनराज टांगले, रघुनाथ तुरस्कर, शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बाल संस्कार शिबिरात योग शिक्षक यशवंत बिरे यांनी योग- प्राणायाम, राज्य सहसचिव विष्णुदास लोणारे – अंधश्रद्धा निर्मूलन, एम. आर. साटोणे -कचऱ्यातून कला, निती आयोग समितीचे माजी सदस्य अविल बोरकर यांनी पाणी बचत व जैव विविधता, प्रा. नरेश आंबिलकर- बोधकथा, प्रदिप काटेखाये- आदर्श विद्यार्थी, समीर नवाज- संगणक व आजचा विद्यार्थी, विलास केजरकर -संस्कार गिते, वसंता केवट-विविध सापा विषयी माहिती, राजु किटे- विद्यार्थी दशा व यशस्वी उद्योजक इत्यादींनी वक्त्यांनी विविध मार्मिक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचे आंनदायी पध्दतीने व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सात दिवशीय संस्कार शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून प्रशांत कुंभारे, आर्या सुखदेवे, प्रिया वाघाये, आराध्या गोस्वामी यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नवाज व प्रास्ताविक संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे यांनी मानले. संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा रामटेके, नविका गाढवे, डिगांबर टांगले, वैभव चेटुले, आरोही गोस्वामी, पिहू भोयर, अक्षरा रोहणकर, क्रिस्टिना गोस्वामी, आर्या सुखदेवे, अंश परिहार, आरोही गोस्वामी, प्रिया वाघाये, आराध्या गोस्वामी, क्रिश वाढई, जय खवास, अर्जुन बान्ते, आर्या उके, आरोही रामटेके, प्रशांत कुंभारे, समिक्षा बांडेबुचे, क्रिश येवले, सुजल वाघाये, डिकेश गाढवे, माही ठवकर, लखन निंबार्ते, त्रिशा धोटे, डेयानी वाघाये, अक्षदा गणवीर, मीरा चक्रवर्ती, शौर्य पिपळशेंडे, ऋतज शामकुवर, दिपांशु येवले, रूणी बांडेबुचे, मंजित रामटेके, सोहम बान्ते, आदित्य येवले, रिया घरडे, नैतिक वाढई, परि खवास, माही बांडेबुचे इत्यादी संस्कार शिबिरातील विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved