
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ साहेब तथा जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा प्रसिद्धीप्रमुख तथा शिवसेना कार्यकर्ता गणेश नामदेवराव चिडे यांची शिवसेनेच्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र मीडिया सेल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली, गणेश चिडे हे आदी मीडिया सेल तालुका प्रमुख पदावर कार्यरत होते, त्यांचा ग्रामीण भागात वरोरा तालुक्यात जनतेशी संपर्क असल्याने त्यांनी रुग्णमित्र, सोशल वर्कर, पत्रकार, समाजाचे नेतृत्व अशे खुप कार्य केले आहे,
हे वर्धा जिल्ह्यात कोविड योद्धा पुरस्कार व चंद्रपूर जिल्ह्यात धनगर रत्न पुरस्कार प्राप्त आहे. त्यांनी शिवसेना पक्षात राहून व सामान्य शेतकरी कुटुंबात राहून जनतेची निस्वार्थी पणे कामे केली असल्याने त्यांच्या नियुक्ती बद्दल ग्रामीण भागात व शहरी भागात आनंद व्यक्त करीत आहे.काही दिवसा अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या निवास्थान मातोश्री येथे जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व वाढदिवसानिमित्त शपथ पत्र गिफ्ट दिले,तसेच महापूर मध्ये शेतकऱ्यांबद्दल कळकळ नेहमी त्यांच्या मनात असतात,मिडिया सेल प्रमुख च्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार अशे व्यक्तव गणेश चिडे यांनी केले.