
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासनी शिबीर 8 वा दिवस हनुमान मंदीर निलजई येथे घेण्यात आले,
त्यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना माजी तालुका प्रमुख वरोरा सुधाकरभाऊ मिलमिले, शिवसेना माजी नगरसेवक वरोरा दिनेशभाऊ यादव,जेष्ठ शिवसैनिक साळवे महाराज, उपतालुका प्रमुख विपीनभाऊ काकडे,मोहनभाऊ बावणे, रमेशभाऊ दाते, विठ्ठलभाऊ वावरे, रुकमाताई खिरटकर, पंढरीभाऊ नागरकर, सुभाषभाऊ हिवरकर, अतुलभाऊ नांदे,मनिषभाऊ साखरकर, समस्त शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका व समस्त गावकरी उपस्थित होते,
तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी निलजई येथील शिवसैनिकांशी संवाद साधून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली.