
मराठी अभिनेत्री अक्षया देवधर ची उपस्थिती राहणार
तुझ्यात जीव रंगला मराठी मालिकेतील ‘अंजली’ येणार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी स्पर्धेचे प्रायोजक भांगडीया फाऊंडेशन असून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर च्या वतीने दि २५ ऑगस्ट ला नेहरू विद्यालय च्या प्रांगणात होणार असून आकर्षक म्हणून तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांची उपस्थिती राहणार आहे,
भांगडीया फाऊंडेशनच्या वतीने स्व.सेठ गोठूलालजी भांगडीया व स्व.धापुदेवी गोठूलालजी भांगडीया स्मृतीप्रित्यर्थ भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन दि २५ ऑगस्ट दु ३ वा नेहरू विद्यालय च्या पटांगणात होणार असून प्रथम बक्षीस ३३,३३३/- रु ट्रॉफी तर द्वितीय बक्षीस २२,२२२/- रु ट्रॉफी आहे. या स्पर्धेत विदर्भातील चमू दाखल होणार आहे,
या दहीहंडी स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार मितेशजी भांगडीया यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बंटीभाऊ भांगडीया राहणार आहे.प्रमुख उपस्थिती मराठी सिनेअभिनेत्री अक्षया देवधर विशेष उपस्थित राहणार आहे,
दहीहंडी स्पर्धेत विदर्भातील चमुनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर भाजप व भाजयुमो ने केली आहे.