Breaking News

संरक्षित असलेला दोन हजार मेट्रीक टन युरीया विक्रीकरिता मुक्त जादा दराने विक्री झाल्यास शेतक-यांनी तक्रार करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-दि.23 ऑगस्ट : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 अंतर्गत दी विदर्भ को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या नोडल संस्थेमार्फत युरीया खताचा 3208 मेट्रीक टन संरक्षित साठा करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार यापूर्वी खरीप हंगामासाठी संरक्षित असलेला 1208 मेट्रीक टन युरीया आणि 650 मे. टन डीएपी साठा मुक्त करण्यात आला. खरीप हंगाम रासायनिक खत संरक्षित साठा कालावधी 31 ऑगस्ट 2022 ला संपत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय रासायनिक खत सनियंत्रण समितीचे (संरक्षित साठा) अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार उर्वरीत 2 हजार मे. टन युरीयाचा संरक्षित साठा जिल्ह्यातील शेतका-यांसाठी विक्रीकरीता मुक्त करण्यात येत आहे.

एमआरपी पेक्षा कुणी जास्त दराने युरीया व खत विकत असेल तर शेतक-यांनी कृषी विभाग, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved