
विशेष प्रतिनिधी
वर्धा:-सावली सास्ताबाद या गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून लाईनमेन नसल्यामुळे लाईनचा नाहक त्रास गावाकऱ्यांना सहन करावा लागत आहे त्यासाठी कार्यकारी अभियंता बोरगाव मेघे यांना निवेदनद्वारे विनंती केली आहे की लवकरात लवकर लाईनमेन द्यावा अशी आग्रही मागणी गावाकऱ्यांनी केली.निवेदन देतेवेळी भाजपा किसान आघाडी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष भूषण झाडे, भाजपा ओ. बी. सी. सचिव सेवाग्राम मंडळ सुधीर वाघमारे , सुनील गुळघाणे, प्रवीण चांभारे, सुरज गुळघाणे, राहुल कडु, राजेंद्र वैतागे, अशोक गुळघाणे, किसनाजी कडु, किसना गुळघाणे, जगनराव चौधरी उपस्थित होते.