
शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखेचे उदघाटन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक प्रकाशजी वाघ साहेब व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात व जेष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरे सर यांच्या सहकार्याने वरोरा तालुक्यातील भटाळा येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले. तसेच रवींद्रभाऊ कांबळे, संदेशभाऊ बोन्डे,
विकासभाऊ जांभुळे, अनिलभाऊ चौधरी, उमेशभाऊ दाते, आशिषभाऊ तुमसरे, संजयभाऊ दाते, संगीतभाऊ बरडे, मनोजभाऊ बावणे, जितेन्द्रभाऊ जाधव, सुनीलभाऊ खेडेकर, अमित भाऊ चिंचोलकर, नितेशभाऊ झाडे, जितेंद्रभाऊ वाकडे, राजुभाऊ गायकवाड, रुपेशभाऊ दडमल, राजुभाऊ झाडे, पिंटूभाऊ नन्नावरे, या युवकांना शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.
त्यावेळेस सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरमामा मिलमिले, शिवसेना माजी नगरसेवक दिनेशभाऊ यादव, शिवसेना मीडिया प्रमुख गणेश चिडे, शिवसैनिक मनीषभाऊ साखरकर व समस्त शिवसैनिक उपस्थित राहून भटाळा येथील युवकांचे शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत केले. तसेच गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक राहणार अ व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शिवसैनिकांना म्हटले.