
चिमूर शहर काँग्रेस कमिटी व विधानसभा युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने – देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम व प्रविण वाळके प्रस्तुत ऑर्केस्ट्रा बीम्स
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर क्रांती भुमित पहिल्यांदा शहर काँग्रेस कमिटी, व विधासभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे अभ्यंकर मैदान म्हणजे किल्यावर ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले असे महामहीम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती आज दिनांक २ ऑक्टोंबर २०२२ रोजी रविवारला सायंकाळी ठीक ५ वाजता अभ्यंकर मैदान चिमूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
जयंतीनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार सोहळा व प्रवीण वाळके प्रस्तुत ऑर्केस्ट्रा भिम्स भजनसंध्या, देशभक्ती गीत संगीत कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाऊ वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , मुंबई कार्यक्रमाचे उद् घाटक संदेश सिंगलकर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई कार्यक्रमाचे सह उद् घाटक डॉ.नामदेव किरसान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबई कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून डॉ.सतिश भाऊ वारजुकर समन्वयक ७४ विधानसभा चिमूर श्रेत्र , प्रकाश सांकपाळ उपविभागीय अधिकारी चिमुर , प्राजक्ता बुरांडे तहसीलदार
चिमुर , डॉ. सुप्रिया राठोड मुख्याधिकारी न.प. चिमूर, मनोज गभने पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाज्ञर असून चिमूर तालुक्यातील समस्त जनतेनी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आव्हान चिमूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे यांनी केले आहे.