Breaking News

पुन्हा एक सायबर विळखा – त्याचा धोका वेळीच ओळखा !

सायबर तज्ञ नामांकित वकील चैतन्य भंडारी, धुळे यांचे मनोगत/सावधानतेचा ईशारा

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- बाहेरच्या जगात लेटेस्ट काय चाललं आहे हे अनेकांना माहित नसत. किंवा माहित असलं तरी त्याबद्दल “इट्स ओके” इतकंच आपलं असत. मात्र एका बाबतीत या सायबर हॅकर लोकांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे की दुसरीकडे त्यांना पकडून चौकात उभे करावे ? हा प्रश्न मला पडलाय.
आता हा नवीन सायबर विळखा पहा.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित झाले आहेत.
कदाचित तुम्हालाही हि बातमी माहित असेल.
पण हॅकर लोकांनी नेमक्या त्या बातमीचा / त्या घटनेचा फायदा कसा करून घेतलाय पहा !

आपल्यापैकी अनेक्जण “फुकट मिळतंय” म्हटलं की जेवणाच्या ताटावरून उठून पळत सुटतात
हे हॅकर लोकांनी बरोबर ओळखून हे नवीन जाळं मार्केटमध्ये (म्हणजे सोशल मीडियावर) टाकले आहे.
ते असे की,
तुम्हाला मेसेज येतो..

“गौतम अडाणी यांना आशियातील श्रीमंत व्यक्ती घोषित केल्याप्रित्यर्थ त्यांच्या तर्फे तीन महिन्याचे रिचार्ज “मोफत” दिले जाणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.”

अनेकजण लगेच धावत सुटतात. अन लिंकवर क्लिक करतात.

आणि तिथेच फसतात. कारण त्यांच्यापुढे मग दोन-तीन धोके स्वागताला हजर असतात.

१) तुमचा फोनच पूर्णपणे हॅक करून त्यातील डेटा चोरला जातो व तो परस्पर मार्केटिंग कंपन्यांना विकून त्यातून हॅकर पैसे मिळवतात (असा डेटा विक्री हा मोठा बिजिनेस सध्या झाला आहे)

२) तुमच्याच फोनमधील फोटो / चॅटिंग इत्यादी वापरून त्या द्वारे तुम्हालाच इमोशनल ब्लॅक मेल करून पैसे उकळले जातात.

३) त्या क्लिक केलेल्या लिंकमध्ये फोन कॅप्चर ची व्हायरस लिंक असू शकते. जी तुमच्या फोनमध्ये घुसते आणि मग तुमच्या फोनचे क्लोन (डुप्लिकेट) त्या हॅकर च्या मोबाईलमध्ये निर्माण होऊन धोका होतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवर जे जे काही कराल ते त्याला तिकडे बसून सगळं दिसू शकत. (एनी डेस्क ऍप प्रमाणे) आणि मग तुम्ही कुणाला जी पे केलं असेल तर तुमच्या बँकेचा पिन तसेच पासवर्ड सरळ सरळ त्याला दिसतो. अन दुसऱ्या मिनिटाला तुमचं खात रिकामं केलं जात.

मग आता यावर उपाय काय ?

तर नक्की आहे. तो हाच की, असे मेसेज (त्यातला एक एक शब्द) नीट वाचायला शिका. उदा. याच मेसेज मध्ये “अदानी” चे नाव “अडानी” टाकलेय. (हॅकर पण काहीवेळा अशा चुका करतात अन पकडले जातात) कारण हिंदीमध्ये तो उच्चार “अदानी” असाच आहे. हे नियमितपणे जे पेपर वाचतात त्यांना कळत. बाकीच्यांना लक्षात येत नाही आणि ते मग “अडाणी” बनतात.

तर असे मेसेज बारकाईने वाचायला शिका. कुठं न कुठंतरी या हॅकर मंडळींनी माती खाल्लेली असते. ती सापडली की “सावध” व्हायच अन त्या मेसेज ला एक तर डिलीट करून टाकायच किंवा सरळ ब्लॉक करून टाकायच. आणि इतरांना हा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर सरळ सायबर सेलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हि माहिती देऊन त्यांना मदत करायची.

डीडी क्लास : येड्याहो… जगात काहीच असं मोफत नसते रे. आई सुद्धा बाळाला दूध तेव्हाच देते जेव्हा बाळ रडत. न मागता असं मोफत कोण कशाला तुम्हाला काही देईल ? इतका बेसिक विचार करत जा न ?
काही येड्या लोकांनी तर याच मेसेज चे स्क्रीन शॉट घेऊन ते “स्टेट्स” ला ठेवलेत म्हणे.
म्हणजे मी तर लटकणारे तू पण लटक… अशी हि तर्हा !
यांची आता चौकातच पूजा केली पाहिजे !
तर मेहेरबानी करून “फुकटच्या” नादी लागून सायबरच्या विळख्यात सापडू नका. नाहीतर फुकटात रस्त्यावर याल !
सावध व्हा. सुरक्षित जगा.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरीकांनी नमुना-6 मधील अर्ज त्वरीत भरून द्यावे – सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 29 : आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या अद्यावत …

तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! – अॅड. चैतन्य एम. भंडारी

प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved