
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यात तलाठी , आर.आय , मंडळ अधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , वाहतूक पोलीस , पोलीस निरीक्षक अवैध रेती माफियांवर कारवाई करण्यात असमर्थ ठरत आहे.यामुळे रात्रीच्या वेळेस राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत राहात असलेल्या जनतेला या ट्रॅक्टर च्या सायलेन्सर फुटलेल्या कर्कश आवाजामुळे रात्रीची झोप उडाली आहे. गस्तीवर असलेले काही पोलीस अधिकारी यांनी रेती माफीयांशी हातमिळवणी केल्याची सुद्धा जनतेमध्ये चर्चा आहे.
म्हणूनच या रेती माफियांची मोठ्या प्रमाणावर दादागिरी वाढत चाललेली दिसून येत आहे. या अवैध रेती व्यवसायामध्ये राजकिय पक्षाच्या महिलांचा सुद्धा समावेश आहे.अशीही मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये चर्चा रंगली आहे.याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे. जिल्हाधिकारी यांनी गोपनीय भरारी पथक नेमून या रेती माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.