Breaking News

कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील सेवानिवृत्ती धारकांचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 ऑक्टोबर रोजी आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील राज्य शासकीय सेवानिवृत्तीधारकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चौथा माळा, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार आहे.

तसेच निवृत्तीवेतन प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने 17 ऑॅक्टोबरला सकाळी 11 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८० वर्षावरील ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सदर लाभ मिळालेला नाही, अशा निवृत्तीवेतन धारकांनी येतांना त्यांचे जन्म तारखेची नोंद असल्याबाबचा पुराव्यासह उपस्थित राहवे. जेणेकरून त्यांना शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात येणारे वाढीव दराने निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

तरी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे निवृत्ती वेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आपल्या अडचणी सोडवण्याचे दृष्टीने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रफूल्ल वडेट्टीवार यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

रस्ते अपघात टाळण्यासाठी वडकी पोलीस स्टेशन येथे हेल्मेट लकी ड्रॉ

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * कायद्याचे धाकाने नको तर स्वतः ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved