
गाव चा सरपंच, तंटामुक्कती अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी तालुका कमेटीने चाहूल नाईक ला शुभेच्छा देऊन केला सत्कार
प्रतिनिधी-नागेश बोरकर
दवलामेटी प्र:-शिकवणी वर्गा शिवाय उच्च शिक्षा प्राप्त करता येते, चाहूल जयकुमार नाईक, रा दवलामेटी, नागपूर ग्रामीण. या विद्यार्थीनि ने, जिद्द आणि मेहनत घेतली तर यश मिळणारच हे सिद्ध केले वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्या साठी नुकतीच नीट चा परीक्षेत ९५ पर्सनटील मिळवून यवतमाळ येथील वसंत राव नाईक वैद्यकिय शासकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. विशेष बाब अशी की चाहूल जयकुमार नाईक ने कुठल्याही प्रकारची शिकवणी वर्गा शिवाय हे यश संपादन केले तसेच चाहूल नाईक ला दहावी- बारावी ला अनुक्रमे ९४% – ९६% टक्के ते पण कुठल्याही शिकवणी वर्गा शिवाय मिळाले होते.
चाहूल चा यशा मुळे दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता उमरेडकर, तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके, वंचित बहुजन आघाडी तालुका कमेटीचे पदाधिकारी यांनी चाहूल नाईक चा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मला मिळालेले हे यश फक्त माझा मेहनतीनेच नाही तर आईं- बाबा व शिक्षकांनी दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे साध्य झाले आहे, विशेष म्हणजे माझ्या बाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मला शिकवले व त्याच मुळे शिक्षणाची जिद्द व अभ्यासाची आवळ माझ्यात निर्माण झाली असे चाहूल नाईक ने चर्चे दरम्यान सांगीतले.
या प्रसंगी रोहित राऊत, दिपक कोरे, नितीन सव्वाशेर, मधुकर गजभिये, सोनु बोरकर, वामन वाहने, रईस डोंगरे, अंनवर अली, छत्रपती शेंद्रे, संदीप सुखदेवे, शेखर गणवीर , विनोद चापेकर, स्वप्नील चारभे, प्रविण अंबादे, नितेश पुंडकर, माधुरी खोब्रागडे, अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, जोत्सना बेले, विद्या गणवीर, प्रीति वाकडे, श्वेता सुखदेवे, चैत्रा पाटिल, चंदा बोबडे, मंगला कांबळे, श्वेता मेश्राम, ममता बोरकर, माला राऊत व ईतर परिसरातील नागरिकांनी चाहूल नाईक चे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या,
चाहूल चा या यशाची प्रेरणा घेऊन गावातली ईतर विद्यार्थि पण शिक्षणाची जिद्द बाळगून मेहनत करतील व आईं वडीलान सोबतच गावाचे नाव उज्वल करतील अशी अपेक्षा करतो तसेच चाहूल ला अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी अशीच मेहनत करत रहा .
रीता ताई उमरेडकर सरपंच ग्राम पंचायत दावलामेटी