Breaking News

रायगड जिल्ह्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विस्तारित प्रकल्प आणि डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: रायगड जिल्ह्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विस्तारित प्रकल्प आणि डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे आदींसह वाडवली गाव, न्यू कफ परेड परिसरातील रहिवाशांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.

आपल्या राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच आहे, त्यासाठी उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्यच केले जाईल. पण उद्योगांनीही स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केले

थळ येथील विस्तारात स्थानिक १४१ प्रकल्पबाधितांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी आरसीएफ आणि राज्य सरकारच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पबधितांना केंद्रीय उद्योग मंत्रालयाने सामावून घ्यावे यासाठी राज्य सरकार केंद्राला पत्र देणार देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाडवली गाव येथे मंदिर, मैदानांची सुविधा उपलब्ध व्हावी आणि आरसीएफने अधिग्रहित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. आरसीएफच्या मुंबईतील प्रकल्पामुळे न्यू कफ-परेड येथील रहिवाशांना होणारा प्रदूषणाचा त्रास रोखण्यासाठी, प्रदूषण नियंत्रणाची मानके काटेकोर पालनाचे तसेच प्रदूषण रोखणारी रिअल टाईम यंत्रणा बसवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

डोलवी (ता.पेण) येथील जे.एस.डब्लू. च्या प्रकल्पात स्थानिकांच्या भरतीबाबतही लवकरच जाहिरात काढण्यात येईल. बंद झालेल्या प्रकल्पातील १२६ उमेदवारांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. भरतीबाबत आणि स्थानिक उमेदवारांच्या भरतीबाबत विविध विभागांनी कंपनीशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कार्यालयाची गुंतवणूकदारांनी केली दाना दान “घोटण परिसरातील विग्ने यनामक एक भामटाही फरार” ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील …

जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved