Breaking News

कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करण्याचे शिक्षण आयुक्त यांचे सुतोवाच

कमी पटसंख्येच्या शाळा बंदच्या निर्णयाविरुद्ध शिक्षक भारतीने उभारली होती ठराव मोहिम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-ग्रामीण भागातील शाळा टिकाव्यात,वाडी वस्तीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाऊ नये यासाठी आपल्या गावातील शाळा वाचव्यात म्हणून शिक्षक भारतीने राज्यात पुढाकार घेऊन प्रशासकीय स्तरावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असताना याविरोधात शिक्षक भारतीने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतचे ठराव घेण्याची मोहीम हाती घेतली.या मोहिमेत विद्यार्थी, पालक,समविचारी संघटना, सामाजिक संघटना, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सहभागी झाले होते.

आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात ही मोहीम शिक्षक भारतीच्या पदाधिकारी तथा सदस्यांनी राबविली.

शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक,गावातील नागरिक,समविचारी व्यक्ती एकत्र येऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळा वाचवा अभियान राबविले.शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांचेवतीने दोन स्वतंत्र ठराव घेण्यात आले.ग्राम स्तरावर आलेले ठराव एकत्र करून ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.ते ठराव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री यांना पाठवण्यात आले.शाळा बंद करण्यात येऊ नये ही मोहिम राज्यभरात शिक्षक भारतीने राबविली. राज्यभरातून हजारो ठराव शासनाला पाठवण्यात आले.

अलिकडेच राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नसल्याचे सांगितले. शिक्षक भारतीने शासनाच्या शाळा बंद धोरणाविरुद्ध उभारलेल्या मोहिमेचे हे यश आहे. राज्यात शिक्षक भारतीच्या सदस्यांनी, समविचारी संघटना, सामाजिक संघटना, पालक, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पत्रकार बांधव यांनी या लढ्यात मोठी साथ दिली. त्या सर्वांच्या लढ्याला आलेले हे यश आहे.

शासनाच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाविरुद्ध शिक्षक भारतीने राज्यात ठराव मोहीम राबवली. शिक्षक, पालक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्याने गावागावात जनजागृती केली. शिक्षण वाचवण्यासाठी शिक्षक भारती नेहमी लढणारी संघटना आहे.वाडी वस्तीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी शिक्षक भारती सदैव लढा देईल.

– सुरेश डांगे, विभागीय सरचिटणीस, शिक्षक भारती

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर विद्युत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल रोकडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी …

स्मार्ट मिटर सक्तीला लावा लगाम वडकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) ने दिले निवेदन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- महाविजवितरण कंपनीने स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved