
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मंगळवेढा:- मंगळवेढा येथील रुग्ण प्रमोद कोलते हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहेत. दवाखान्याचा होणार खर्च हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे ते रुग्णालयाचा खर्च करू शकत नव्हते. त्यांनी लगेच गणेश चव्हाण (वैद्यकिय सहाय्यक, समन्वयक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष) तसेच श्रीकांत सानप (वैद्यकीय सहाय्यक) यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कागदपत्रे घेऊन लगेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधी साठी अर्ज करण्यात आला आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून १ लाख रुपये मदत करण्यात आली. रुग्णाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगेश चिवटे, गणेश चव्हाण, श्रीकांत सानप यांचे आणि टीमचे आभार मानले.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.