Breaking News

सिम स्वॅप फॉडपासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सायबर गुन्हेगारांनी नागरीकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन प्रकार शोधला आहे तो म्हणजे सिम स्वॅप. आता हे सिम स्वॅप म्हणजे काय आहे ? सिम स्वॅप फ्रॉड सिम कार्डला बदलणे किंवा त्याच नंबरावर दुसरे सिम कार्ड घेणे. सिम स्वॅपिंग मधील तुमच्या मोबाईल नंबराव्दारे व नावाव्दारे एक नविन सिमचे रजिस्टेशन केले जाते त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गायब करतो व तुमचा मोबाईल नंबर त्याच्याकडे चालू करुन घेतो याचाच सायबर गुन्हेगार गैरफायदा घेवून तुमच्या नंबरवर येणारे ओटीपी त्याच्या नंबरवर मागवतो व त्याव्दारे तुमच्या बँक खात्यातले पैसे गायब केले जातात.

सायबर गुन्हेगार फिशिंग किंवा वायरस व्दारे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि बँक खात्याची माहिती मिळवतात त्यानंतर सर्व्हिस प्रोवायडरला योग्य ग्राहकाची ओळख सांगून संपर्क करतात आणि कस्टमर व्हेरिफिकेशन नंतर सर्व्हिस प्रोवायडर हा ग्राहकाकडील जुन्या सिम कार्डला डिअॅक्टीव्हेट करतात आणि सायबर गुन्हेगार नविन सिम कार्ड अॅक्टीव्ह करुन घेतो. म्हणून नागरीकांनी सिम स्वॅप फ्रॉडपासून सतर्क रहावे आणि आपले फोनचे नेटवर्क, कनेक्टीव्हीटी स्टेटस संबंधी माहिती ठेवावी जर कुणाला आपल्या फोनवर कॉल, एसएमएस येत नसेल तर सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधवा.

तुमच्या फोनवर लागोपाठ अज्ञात नंबरने कॉल किंवा ब्लॅक कॉल येत असेल तर आपले फोन स्वीच ऑफ करु नका व सदरील अज्ञात नंबरांना प्रतिसाद देवू नका. आपल्या फोन मध्ये अॅन्टी वायरस अपडेट ठेवा. टु फॅक्टर ऑथन्टीकेशन आपल्या फोनमध्ये सुरु ठेवा किंवा ऑन ठेवा. आपले एसएमएस व आपल्याला येणारे ईमेल आपण नेहमी बघत रहावे. आपल्या बँकेला दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हा कुणालाही शेअर करु नका. पब्लीक वायफायचे वापर टाळा. आपल्या आर्थिक व्यवहाराची बँकेकडे एक मर्यादा ठेवून आपल्या बँक खात्याचे एक ट्रॉन्सक्शन लिमीट ठेवावे आणि आपले आंतरराष्ट्रीय बँकींग ट्रॉन्सक्शन बंद ठेवावे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ते सुरु करावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

म.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण केव्हा होणार

गटविकास अधिकारी यांना माजी सरपंच धनराज डवले यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गेल्या …

टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved