Breaking News

नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

प्रश्न:- गाव नमुना सहामध्ये मालकी हक्क बदलाच्या नोंदीबाबतच्या कागदपत्रांसाठी चेक लिस्ट आहे काय?

उत्तर:- मालकी हक्क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्ये नोंदवितांना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी.

★ नोंदणीकृत दस्ताशिवाय व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही √)

★ नोंदीसाठी दिलेली कागदपत्रे प्रमाणीत व योग्य आहेत काय? (होय√ / नाही)

★ तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्याविरुध्द व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही√ )

★ परवानगीशिवाय बिगर शेतकरी व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे काय? (होय / नाही√ )

★कुळकायदा कलम ४३ चा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही √)

★ कमाल जमीन धारणा कायद्याचा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही√ )

★भूसंपादन कायद्याचा भंग करुन व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही√ )

★ विविध निरसीत कायद्यांविरुध्द व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही√ )

★इतर हक्कातील बँक/सोसायटी बोजे असतांना ना हरकत दाखल्याशिवाय व्यवहार झाला आहे काय? (होय /नाही√)

★ जमीनीचा धारणा प्रकार सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय व्यवहाराला संमती देतो काय? (होय√ /नाही)

★विविध कायद्यातील तरतुदींविरूध्द व्यवहार झाला आहे काय? (होय / नाही√ )

★जमिनीच्या क्षेत्राचा मेळ बसतो काय? (होय√ / नाही)

लेखक – डॉ. संजय कुंडेटकर, (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन)

शब्दांकन व प्रसारण:- अमरनाथ स. शेणेकर (रिअल इस्टेट कन्सलटन्सट), कोल्हापूर.
मोबाईल: 7350201000, 8459348218.

महसूली कामकाज, शेतकऱ्यांसाठी तसेच मिळकत धारकांसाठी उपयुक्त अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तरे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

सहकारी संस्थेचा सहकार कायदा (सोसायटी) व ओनरशिप कायदा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जगदीश काशीकर यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) / (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत.

ऊपनिबंधक नितीन दहिभाते यांनी गेली तीन ते चार वर्ष तनावात असलेल्या मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीवर वर्षभरापुर्वि प्रशासक (अेडवाेकेट सुनिल खोचरे व विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली होती व येणारया काही दिवसात
जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि राजकिय पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्क्षित गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा भविष्यात कोमल रहिवाशी सोसायटी व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणताहि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतील योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला/नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूका मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे.

अश्या परिस्थीतीत जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या – निवडणूक निरीक्षक जाटव

राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 : चंद्रपूर …

काँग्रेसला मोठा धक्का,या उमेदवारांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच जात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved