
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या ब्लास्टनंतर प्रत्यक्ष जाऊन या बोगद्यातील कामाची पाहणी केली
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नवी मुंबई: कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमुळे हा बोगदा एकमेकांना जोडला जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने आकारास येत असलेल्या या मार्गाच्या बांधकामास आता वेग आलाय. या मार्गावरील दोन मार्गिकांपैकी एक मार्गिका आता खुली होणार आहे.
या मार्गामुळे नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत नक्कीच बचत होणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली शहरांचे अंतर अंदाजे सात किलोमीटर ने कमी होणार असून प्रवाशांच्या वेळेची सुद्धा बचत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या ब्लास्टनंतर प्रत्यक्ष जाऊन या बोगद्यातील कामाची पाहणी केली.
सध्या या भागातील रहिवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा मार्ग पूर्ण झाल्यास हा त्रास कायमचा दूर होणार आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एमएमआरडीए आयुक्त एस.सी.आर.श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.