Breaking News

कायदयाचा पुस्तकी अभ्यास आणि कायदयाची प्रत्यक्षात अमंलबजावणी याबाबत ऍड. अलका शेळके/मोरेपाटील, नाशिक यांचे ह्रदय स्पर्शी मनोगत व धक्कादायक वास्तव

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक:-कायदयाचा अभ्यास केला कारण कायदयाबद्दल आदर होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजले म्हणून कायदा समजून घेण्यासाठी कायदा चा अभ्यास केला. परंतु कायदयाचा पुस्तकी अभ्यास आणि कायदयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी मागील 20 वर्षाच्या अनुभवात एक लक्षात आले की कायदा किती निष्प्रभ आहे आणि कायदयामध्ये बदलाची किती आवश्यकता आहे. त्याच बरोबर कायदयाची अंमलबजावणी करणारे ही तेवढच अभ्यासू आणि कायदयाचा परिपूर्ण अभ्यास असणारे असले पाहिजे तरच कायदयाचा आदरयुक्त धाक गुन्हेगारांना असणार.

तालुका स्तरा वर राजकीय दबाव वापरून गुन्हे दाखलं होतात किंवा कायदयाचा गैरवापर केला जातो. शहरी भागात कायदयाचे रक्षक हेच दलाला चे काम करतात आणि आरोपी ला मदत करण्यासाठी दलाली स्वीकारतात. पोलीस स्टेशन मध्ये गरीबाला धमकी आणि पैशावाल्या ला खुर्ची दिली जाते. न्याय व्यवस्था आणि न्यायदान करणारे किती अभ्यासु असतात हे न्यायनिवडा वरून समजते. आज या सगळ्यां परिस्थिती मध्ये सर्वसामान्य माणूस कायम गोंधळेला असतो.

अडचणीत असणारा एखाद्या माणसाची जर मोठ्या वकीला सोबत ओळख असेल तर त्याला अनेक सल्ले मिळतात तो माणूस मोठ्या मोठ्या बढाया मारतो. पण गरीब हा न्याया साठी उपेक्षित होवून राहतो. अशा उपेक्षिता साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा अभ्यासला आणि संविधान लिहिले पण काय उपयोग? जेंव्हा पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांच्या कुटुंबा वर संकट येते किंवा न्यायाच्या चुकीच्या कचाट्यात ते स्वतः अडकतात तेंव्हा त्यांना एखाद्या गरीबाची वेदना समजू शकते. खरा माणसांची किंमत समाजाला कधीच नव्हती व नाही म्हणूनच परावलंबन वाढलं आहे. कायदयामध्ये दलाली वाढून कायदा संपला आहे.

हिच परिस्थिती काही हजार वर्षा पूर्वी होती तेंव्हा सामान्य जनतेला त्रास देणारे परके होते व आता त्रास देणारे आपलेच आहे. म्हणून त्या वेळी कागद व लेखणी सोबत शस्त्र ही छत्रपती शिवाजी महाराजांना हातात घ्यावे लागले होते व तीच वेळ आता देखील आली आहे. कायदा व्यवस्था, कायदा न्यायदान आणि कायदा आमलबजावणी यात बदल होणे आवश्यक आहे. अन्यथा संविधान लयास जावून आराजक्ता वाढणार. हे सत्य. आणि सर्व सामान्य जनतेला परत एकदा स्वतंत्रा चा नवा लढा देण्यास तयार राहावे लागणार.*(तारीख पे तारीख सिर्फ यही वकालत और कानून है?..)* म्हणूनच पीडित महाराष्टीयन माणसाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या न्यायदाना वर विश्वास होता हे आपण विसरून चालणार नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिल रोजी शेवगाव शहर झाले भगवे मय

* सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन “जय श्रीराम” च्या …

वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा फायदा घ्यावा – विठ्ठलराव बदखल

रिवार्ड्स संस्था येथे एक दिवसीय शेतकरी यांचे प्रशिक्षण तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-समाज प्रगती सहयोग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved