Breaking News

नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्ष आणि छत्रपती संभाजी महाराज प्रणित स्वराज्य संघटना यांना एकमेकांच्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी पाठिंबा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक: नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघात स्वराज्य संघटनेचे नेते माजी खा. छ्त्रपती संभाजी महाराज आणि आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या अधिकृत उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मते देण्यावर सहमती दर्शवली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार ईश्वर पाटील तसेच स्वराज्य संघटेनेचे उमेदवार सुरेश पवार यांना आपापल्या समर्थक मतदारांनी दुसऱ्या पसंतीचे मते देण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज आणि आप राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केले आहे. या कामी स्वराज्य चे महाराष्ट्र प्रवक्ते करण गायकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

“आजचा हा निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह आहे. राज्यातील जातीयवादी शक्तींना दूर करून शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आगामी काळात राज्याच्या राजकारणात नवीन महत्त्वपूर्ण समीकरणे यामुळे निर्माण होतील”, अशी प्रतिक्रिया आप राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया आणि राज्य संयोजक रंगा राचूरे यांनी दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved