Breaking News

विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास शक्य -वाय. सी. रामटेके

सुसंस्कार शिबिर प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- एप्रिल महिन्यात परिक्षा संपली की विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी मामाच्या गावाला जात होते. मात्र आता मामाचा दुर झाल्याने हातात मोबाईल चे वेड लागले आहेत. शालेय जीवनात विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श दिनचर्या, आई -वडिल व गुरूंजनांचा आदर करण्यास प्रोत्साहन देणे. देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक शिक्षणा व्यतिरिक्त जीवन शिक्षणाचे आदर्श धडे विद्यार्थ्यांना देऊन आदर्श नागरिक घडवावे. याकरिता संस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास होणे शक्य आहे असे प्रतिपादन भागिरथा भास्कर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. सी. रामटेके यांनी केले. ते भागिरथा भास्कर अनुसूचित जाती -जमाती शिक्षण संस्था आंभोरा व्दारा संचालित टवेपार येथील भागिरथा भास्कर हायस्कूल व संस्कार चळवळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात व्यक्तिमत्व विकास, सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वाय. सी. रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून नीती आयोग समितीचे सदस्य अविल बोरकर,‌ बाल संस्कार शिबिर प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, उपसरपंच प्रभू मते, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम कोसरे, गोपाल सेलोकर इत्यादी उपस्थित होते.

बाल संस्कार शिबिर दिनांक २२ ते २८ एप्रिल २०२४ पर्यंत चालणाऱ्या शिबिरात योग- प्राणायाम, संस्कारमय गीत, बोधकथा, बौद्धिक तासीका, स्पर्धा परीक्षा, चित्रकला, टाकावू पासून टिकाऊ वस्तू, आपत्ती व्यवस्थापन, नृत्य, सुंदर हस्ताक्षर, अंधश्रद्धा निर्मुलन, अभिनय अशाप्रकारे विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. विद्यार्थी -विद्यार्थींनींनी या शिबिराच्या माध्यमातून आदर्श जीवनाची कला, आत्मसंरक्षण, नेतृत्व क्षमता, एकीचे बळ यांचे धडे देण्यात येईल.असे प्रतिपादन नीती आयोग समितीचे सदस्य अविल बोरकर यांनी केले.त्यावेळी खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी योग-प्राणायाम यांचे महत्त्व व संस्कार शिबिर यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले,तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल सेलोकर व प्रास्ताविक संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षा झंझाळ यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता प्रणय बन्सोड, एन. के. देशभ्रतार, ए.एम. शंभरकर, ए. झेड. शेंडे, हर्षा झंझाळ, जी. एन. नान्हे, अवंतिका मने, रिधिमा लुटे, सलोनी कडव, किर्ती लुटे, जागृती कोसरे, अर्थव कातोरे, पूनम लुटे, नैतिक मते, अक्षरा कडव, दिव्या कातोरे, नैतिक सेलोकर, कुणाल सोनवाने, आयुष पुडके, वेदांत लुटे, क्रिश ब्रोंद्रे इत्यादी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी मोलाचे सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved