Breaking News

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा?

महसूल अधिकारी कोमात का?

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर : – चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियाचा हैदोस वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे रेती घाटाचे लिलाव न झाल्याने घर तसेच सिमेंट काँक्रीटीकरण रोडचे बांधकामावर मोठ्या प्रमाणावर रेतीची मागणी आहे. त्यामुळे दिवस – रात्र सर्रासपणे रेती माफिया जंगल पाठातून तसेच उमा नदी पात्रातून रेतीची चोरी ट्रॅक्टर द्वारे करतांना आढळून येतात. या माफियांमूळे जनतेची रात्रीची झोप उडाली आहे.

पोलिसांची दिनांक.२३/०४/२०२३ ला रात्रीच्या वेळी १२:१० मिनिटांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर चे पोलीस उप निरीक्षक खैरकर यांनी ट्रॅक्टर मुंडा क्रमांक.MH34 AP 4117, ट्रॉली क्रमांक.MH34 A 5754 ला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ( ITI college ) चिमूर जवळ रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन चिमूर येथे वेळ १२:४० ला लावण्यात आला.

यावेळी चालक राजपाल शंकर सवसाकडे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ची चर्चा मोठ्या प्रमाणावर चिमूर शहरात रंगली आहे. काही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सुद्धा रेती , मुरूम , गिट्टी , विटा चे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असतांना सुद्धा त्यांच्यावर महसूल विभाग व पोलीसांची कारवाई होतांना दिसत नाही. माजी सेवानिवृत्त सैनिक तथा वन रक्षक यांच्यावर भ्याड हल्ले केले जातात तलाठ्यांच्या हातातून पकडलेला ट्रॅक्टर हिसकावून पळवून नेले जाते तरीही त्या माफियांवर कारवाई होतांना दिसत नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved