Breaking News

बरडघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जि. प. प्रा.शाळा, बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेश सहारे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नरेश भोयर,कल्याणी दोडके, आशा पोईनकर, अंगणवाडी सेविका पद्माताई रिनके,सोनाली बारेकर,मुख्याध्यापक सुरेश डांगे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले.ते स्वराज्य सर्वांसाठी होते.रयतेच्या हिताचे होते. शिवरायांनी कधीही भेदभाव केला नाही.सर्वांना समान न्याय दिला. शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालल्यास प्रगती होईल असे प्रतिपादन सुरेश डांगे यांनी केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा’ विद्यार्थी, शिक्षक तथा उपस्थितांनी गायिले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अर्चना डफ यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved