Breaking News

राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी मारोतराव अतकरे

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी कवडू लोहकरे यांची नियुक्ती.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चळवळीला व्यापक स्वरुप येण्यासाठी व ओबीसी समाजाच्या न्याय व हक्काला लढा देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी -अधिकारी महासंघाच्या अध्यक्ष व सचीव पदाची नियुक्ती हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात आली.
१९ फेब्रुवारी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षपदी मारोतराव अतकरे तर सचीव पदी प्रभाकरराव लोथे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी कवडू लोहकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचीव पदी रविंद्र उरकुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक प्रा. राम राऊत , जिल्हा सहसचीव रामदास कामडी,राजेंद्र शेंडे , ईश्वर डूकरे ,श्रीहरी सातपुते, प्रा.पितांबर पिसे , राजकुमार माथुरकर , योगेश थुटे, प्रभाकरराव पिसे , राजेंद्र लोणारे , अविनाश अगडे,नागेश चट्टे , धर्मदास पानसे, सुखदेव वाघे, दिलीप डुकरे ,राजू दांडेकर, ताराचंद बोरकुटे, पटवारी कोपहरे श्रृतिका बंडे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.नवनियुक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व सचीव यांचे पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved