
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-टायगर ग्रुप वरोरा यांच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुप चे सर्वेसर्वा पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या उपस्थिती सह मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर टायगर ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब जाधव नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते टायगर ग्रुप गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दिपक बारसगडे ,चंदू वैद्य या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
टायगर ग्रुप वरोरा तालुक्याचे प्रमुख रिषभ रठ्ठे व त्यांचे सहकारी गेल्या 8 वर्षा पासून सतत लोकांच्या सेवेत धाऊन जातात आणि प्रत्येक वर्षात 10 ते 12 कार्यक्रम घेत असतात आज हे सर्व काम बघून वरोरा येथे येण्याचे स्विकारले व वरोरा येथे तानाजी जाधव यांचे आगमन झाले, यावेळी समस्त जनतेचे आभार व्यक्त करुन तानाजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी उपस्थित टायगर ग्रुपचे मारुती नामे, बाला चांभारे, शारदुल पचारे, प्रीतम ठाकरे ,प्रतिक तिरांकर, मुकेश पाटील ,महेंद्र आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.