
दिव्यवंदना आधार निवारागृहचा भुमिपूजन सोहळा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी :- रस्त्यावर फिरणारे बेघर, बेवारस, भिक मागुन खानारे भिक्षेकरी तसेच ज्यांना कुठल्याच प्रकारचा आधार नाही अशा निराधारांसाठी दिव्यवंदना आधार फाऊंडेशन व्दारा संचालित दिव्यवंदना आधार निवारागृह चा भुमिपुजन सोहळा २६ फेब्रुवारी रविवार ला भिसी अप्पर तालूका अंतर्गत येणाऱ्या जामगाव (कोमटी) येथे चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राच आमदार किर्ती कुमार भांगडीया यांचे हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, टायगर गृपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अङबाले, प्रशांत नखाते, दिपक भारसागडे, संजय बारापात्रे, बंटी वनकर, साईअन्ना तुलसीगीरी, मधुकर गोडे, आशिष बोबडे, प्रयाग डोंगरे, नितेश बानोत, राजु पाटील, मंगेश बोबडे सह अनेक मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.या भुमिपुजन कार्यक्रमाला परीसरातील जनतेनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थीत राहण्याचे आव्हान दिव्यवंदना आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पसारकर यांनी केले आहे.