
मुख्य मार्गावर जागा मिळाल्यास भारतीय स्टेट बँकेची दुसरी शाखा करणार सुरू – संजय श्रीवास्तव महाप्रबंधक
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भारतीय स्टेट बँक शाखा चिमूर ची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे . ग्राहकांची मोठी गदी होत असून आवक जावक मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँक साठी जागा मिळाल्यास येत्या दोन वर्षात दुसरी शाखा सुरू करणार असल्याचे मत भारतीय स्टेट बॅंकेचे महाप्रबंधक संजय श्रीवास्तव यांनी चिमूर येथील भारतीय स्टेट बॅक चिमूर शाखेच्या नूतनीकरण कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले .
ते पूढे म्हणाले , निलेश कांयदे यांच्या पुढाकारातून नृतनीकरण शाखेमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी सुसज्य व्यवस्था , पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था , शीत युक्त बॅंक , गर्दी कमी होण्यासाठी बसण्याकरीता जास्तीचे कॉटर या नृतनीकरण शाखेत समाविष्ट करण्यात आले आहेत .
आमदार कीर्तीकुमार भांगडिया म्हणाले की बँकेनी तरुण बेरोजगार यांना मुद्रा लोन देऊन रोजगार निर्मिती करावी आणि लोन देत असतांना अडचणी निर्माण न करता सुलभ मार्गदर्शन करावे तसेच येत्या आठ दिवसात मुख्य मार्गावर नवीन शाखा साठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंचावर आमदार किर्तीकुमार भांगडीया पूर्णेन्दकांन्त मिश्रा श्रेत्रीय प्रबंधक चंद्रपूर , मु . नरसिंहराव उप – महाप्रबंधक नागपूर आचर , शाखा व्यवस्थापक निलेश कांयदे उपस्थित होते.
संचालन व आभार स्मिता गेडाम यांनी व्यक्त केले.