
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडियावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीसचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पीडित महिलेने चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार. पिडीता आणि त्यांचे पती साईनाथ बुटके हे चिमूर येथे राहतात. साईनाथ बुटके यांचे मोठे बंधू गजानन बुटके हे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आहे, दिनांक ११ मार्च ला सायंकाळी ७ च्या सुमारास भाजपाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह साईनाथ बुटके यांच्या घरासमोर आले त्यांनी साईनाथ बुटके यांना शिवागाळी करून त्यांच्या घरात जबरदसतीने शिरले आणि साईनाथ बुटके ला मारहाण करत बाहेर घेऊन आले.
या मारहानीला विरोध केला असता, त्यांचा विनयभंग केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. आणि त्यांच्या दोन लहान मूल शौर्या वय ८ वर्ष. व विहान वय ५ वर्ष या लहान मुलांनाही मारहाण करण्यात आली असे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारी नंतर भांगडिया यांच्यासह त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्या विरुद्ध कलम ३५४. १४३. १४७. १४९. ४५२. ३२३. २९४ अन्वये विनयभांगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान शेकडो नागरिकांचा जमाव पोलीस आवारात जमा झाला असतांना पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे संमय सूच्कतेने कोणताही कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही, व शहरातही भीतीचे वातावरण निर्माण होऊ दिले नाही. पुढील कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी. सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गद्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज गभने, सहाय्यक पोलीस निरीक्षक जामभले, चांदे. पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख. भीष्मराज सोर्ते. कैलास आलम करीत आहे.