
प्रतिनिधी-शशीम कांबळे राळेगाव
वणी:-गरीब, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘मस्ती की पाठशाला’ या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान होणार आहे. या इयत्ता 6 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. शिबिरासाठी कोणतेही शुल्क नसून पहिले नोंदणी करणा-या 100 विद्यार्थ्यांना या शिबिरात प्रवेश मिळणार आहे.
शिबिर हनुमान मंदिर जवळ गुरुनगर येथे हे शिबिर होणार आहे. स्माईल फाउंडेशनतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा गरजू व गरीब विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केली आहे.
सदर शिबिर हे रोज 1 ते 2 तास होणार असून या शिबिरात स्पोकन इंग्लिश, व्यक्तिमत्व विकास, वाचन कौशल्य, वृत्तपत्र वाचन, लेखन कौशल्य, व्याकरण, कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पिकिंग, आउट डोअर गेम, फन आणि लर्न गेम इत्यादी उपक्रमांचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभवी व प्रोफेशनल शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात प्रथम नोंदणी करणा-या 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. नोंदणीची शेवटची तारीख ही 10 एप्रिल आहे.
मस्ती की पाठशालात सहभागी व्हा – सागर जाधव
उन्हाळा हा मुलांच्या सुटीचा काळ असतो. त्यामुळे मुलांना खेळातून शिक्षण देण्यासाठी आम्ही या वर्षी मस्ती की पाठशाला हा उपक्रम राबवला आहे. आनंददायी वातावरणात मुलांना शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त मात्र शिक्षणाशी जवळचा संबंध असलेले उपक्रम राबवले जाणार आहे. या कार्यशाळेतून मुलांना शिक्षणाची नवी वाट मिळेल.
– सागर जाधव, स्माईल फाउंडेशन
स्माईल फाउंडेशन ही परिसरातील एक सुपरिचित संस्था असून याद्वारे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जाते. गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळी शिबिर या संस्थेद्वारा घेण्यात येते. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्माईल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क – हनुमान मंदिरा जवळ, गुरुनगर, वणी
अधिक महिती व नोंदणीसाठी संपर्क – 7038204209, 7517808753