
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज दिनांक 23 /3/ 2023 रोज गुरुवारला राहुल जी गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप कडून आकांडतांडव सुरू असून त्यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी दिनांक 23 /3/ 2023 रोजी त्यांना कोर्टात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेचा व हुकूमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपने राहुल गांधी विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकविण्याचे षडयंत्र रचले आहे. अश्याच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना आज दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
भारतीय जनता पक्ष्याच्या या षडयंत्रविरोधात आम्ही तीव्र निंदा करीत असून याचा जाहीर निषेध करीत आहो तसेच लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने चिमूर काँग्रेस कमिटी यांच्याकडून चिमूर तहसील ऑफिस पुढे घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध करीत आहोत व चिमूर चे तहसीलदार प्राजक्ताजी बुरांडे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील गावंडे, प्रा राम राऊत सर महाराष्ट्र प्रदेश सेवादल सहसचिव, अविनाश अगडे अध्यक्ष चिमूर शहर काँग्रेस ,ओम प्रकाशजी खैरे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस चिमूर, नागेश चट्टे उपाध्यक्ष विधानसभा यु.कॉ.चिमूर, बाळूभाऊ बोभाटे सचिव शहर काँग्रेस चिमूर, विलास हरिभाऊ पिसे नेरी शिरपूर संपर्क प्रमुख, प्रशांत डवले उपाध्यक्ष ओबीसी युवा काँग्रेस, देविदास मोहीनकर, धनराजजी मालके, राकेश साठोणे, तुषार शिंदे माजी.उपाध्यक्ष न.प.चिमूर ,सुधीर भोयर, दिलीप सुर ,नितीन कटारे माजी.नगर सेवक न.प.चिमूर ,योगेश अगडे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.