
आझाद वॉर्डातील महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद वॉर्डातील वनिता बार रेस्टॉरंट व लॉज दुसरीकडे स्थानांतरीत करणेबाबत आझाद वॉर्ड येथील महिला व पुरुषांनी एकत्र येत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले. चिमूर शहरातील वनिता बार् व रेस्टॉरंट परिसर हा दाठ लोकवस्ती असलेल्या परिसर असून या परिसरात मजुरी तथा इतर व्यवसाय करणारे नागरिक वास्तव्याने राहत आहेत, सदर परिसरात बोऊधे धर्माचे पवित्र स्थळ बुद्ध विहार आणि मुस्लिम समाजाचे पवित्र स्थळ मज्जिद व दर्गा आहे.
वनिता बार आणि लॉज कडे जाणारा मार्ग हा अरुंद स्वरूपाचा असून या मार्गाने जाणारे आंबटशौकीन गुंड प्रवृत्तीच्या. व व्यसनाधीन लोक रस्त्याच्या शेजारी असलेल्या महिलांना व तरुणींना असशील शब्बदात बोलून अश्छिल इशारे करून महिलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येथील लॉज वर येणारे लोक आझाद वॉर्डातील महिलांना अशशील हातवारे करीत असल्यामुळे या परिसरातील वातावरण गढूळ झाले असून सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. महिलांना घरातून कामानिमित्त बाहेर पडणे सुधा कठीण झाले आहे.
अश्या परिस्थितीत या परिसरातील महिलांनी तरुणींनी जगावे तरी कसे अस्या प्रकारचे गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
या संदर्भात आज दिनांक 21 मार्च रोजी जिल्हाधीकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्फत व पोलीस उपविभागीय अधिकारी चिमूर, मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. पालक सुधीर मुंगनटीवार. पोलीस अधीक्षक चंद्रपूर याना निवेदन देण्यात आले आहे.