Breaking News

भरदुपारी महिलेस लुटुन दुचाकीस्वार झाला पसार

 

दुचाकीस्वारांनी महिलेची पर्स लांबविली

पाठलाग करतांना एकाने दाखविली रिव्हॉल्व्हर दुसरा पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-खैरी – चिंचमंडळ रस्त्यावरील थराराने प्रचंड खळबळ – अलीकडेच क्राईमचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतांना भर दुपारी एका महिलेची पर्स लुटून पोबारा करणाऱ्या व त्यांचा पाठलाग करणाऱ्याला एका संशायिताने थेट रिव्हॉल्व्हर दाखविली तर दुसऱ्यास पकडण्यास खैरीच्या युवकांना यश आले.

ही धक्कादायक घटना आज सोमवारला दुपारी १२ वाजताचे दरम्यान खैरी येथील गोटाडी तांडा वस्ती चौरस्त्यावरील मार्गावर घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील एक व्यक्ती व महिला वडकी येथील सेंट्रल बँक मधून दुचाकीने खैरी कडे येत असताना खैरी गोटाडी बस थांबा जवळी गतीरोधकाजवळ येताच अज्ञात पणे त्यांचा पाठलाग करणारे दोन जणांनी यादरम्यान महिलेची पर्स हिसकावून पलायन केले. त्यावेळी महिला ओरडली तेव्हा तिथे उपस्थित ओम भोरे व युवकांनी मोटारसायकलने पाठलाग केला. अशातच धानोरा शिवारात चोरट्यांच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने दुचाकी सोडुन शिवारात पळ काढण्याचा प्रयत्न झाला.

मात्र खैरी येथील युवकांनी त्या संशायितांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावू लागले. या थरार प्रसंगात एकाने चक्क रिव्हॉल्व्हर काढले आणि युवकांच्या दिशेने ते रिव्हॉल्व्हर दाखवित पोबारा केला. मात्र दोघांपैकी एका जवळ कोणतेही शस्त्र नसल्याने खैरी युवकांना एकास पकडण्यात यश मिळविले. घटनेची माहिती तात्काळ मिळतात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले व बीट जमादार अरुण भोयर पोलीस तात्यासह तात्काळ दाखल होऊन आरोपीस ताब्यात घेतले तर दुसऱ्या आरोपीचा शोध वडकी पोलीस हे करीत आहे‌

सुरू केला मात्र बातमी लिहिपावेतो दुसरा आरोपी सापडला नव्हता.पकडलेल्या आरोपीचे नाव आरोपी हिरा लक्ष्मण लिंगाडे वरोराअसे सांगत असून खरे नाव काय ते अजून कळाले नाही. तर फरार आरोपीचे नाव शुभ्या असे सांगत आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विजय महाले बीड जमादार अरुण भोयर करीत असून बातमी लिही पावतो आरोपीवर गुन्हा दाखल व्हायचा होता व पुढील तपासणी करीत होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved