
कारवाई दरम्यान चारही ट्रेकटरचालक ट्रॅक्टर च्या चाव्या घेऊन पसार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील पिपर्दा येथील उमा नदी घाटावर अवैध रेती तस्करांचा रेती तस्करी चा हैदोस सुरू असल्याची गोपनीय माहिती चिमूर तालुक्याचे तहसीलदार मॅडम यांना मिळताच दि 16 एप्रिलला सकाळी सहा वाजता तहसीलदार मॅडम नी रेतिघाट गाठीत धडक दिली असता चार ट्रॅक्टर चालक वाहन जागेवर ठेवून चाब्या घेऊन पसार झाले सदर ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली परंतु चाव्या नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करता आले नाही, सदर कारवाईत तहसीलदार मॅडम यांनी चारही ट्रॅक्टर वर कारवाई केली पंचनामा करून सदर वाहन जमा करन्याचे आदेश दिले परंतु वाहनचालकांनी वाहनाच्या चाव्या सहित पसार झाल्याने वाहन तहसील कार्यालयात जमा कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला.
तेव्हा तहसीलदार मॅडमनी पिपर्दा येथील पो पाटील व महसूल मंडळ अधिकारी तिडके याना वाहनावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले परंतु आदेशानंतर देखरेख करीत असताना वाहनचालकांनी मनमानी करीत रेती सहित वाहने पळवून नेली त्यामुळे रेतीतस्करच्या मनमानी व उर्मट वागणुकीचा प्रत्यय समोर आला आहे या येवठ्या मोट्या करवाईनंतरही रेतीतस्करी करणाऱ्या तस्करांनी कायदा बाजूला सारून रेतीचा कायदा हातात घेतल्याने तालुक्यात रेतीतस्करांचा मनमानीला रोखणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे तेव्हा सदर प्रकरणी चारही वाहनांचा तपास करून वाहने जप्त करून त्याच्यावर म्हसुलविभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
————
सदर चारही वाहनावर पिपर्दा येथील उमानदीचे घटनास्थळ गाठून कारवाई केली असता पसार झालेल्या चारही ट्रॅक्टर वर कारवाई सुरू असून लवकरच तहसील कार्यालयात जमा करून कारवाई करण्यात येईल.
तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मॅडम चिमूर