
निलमताई गोऱ्हे, आणि अंबादास दानवे यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे ७ कोठी ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण एक वर्षापूर्वी उघडकिस आले. त्यानंतर या प्रकरणात चिमूर पोलीस स्टेशन येथे सहा महिन्यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणात येत्या आठ दिवसांत आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवार २६ एप्रिल पासून संस्थेच्या अध्यक्षासह कर्मचारी खातेदाराणी तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आज चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने पाठिंबा दिला असून उपविभागीय अधिकारी मार्फत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना निवेदन देण्यात आले.
चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे अफरातफर झाल्याची तक्रार चिमूर पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी २०२१ मध्ये संचालकांनी केली. त्यानंतर अंकेशन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३० सप्टेंबर २०२२ ला संबधीतावर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर प्रकरण जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले या सर्व भानगडीत ठेवीदारांची जमा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधित आरोपीवर कारवाई करुन रोखरक्कम जमा करून मिळेल या आशेवर ठेवीदार व खातेदार आहेत. संस्थाचालक. कर्मचाऱ्यांना ठेवीदार खातेदाराकडून जमा रकमेकरीता सतत तगादा लावण्यात येत आहे.
या संदर्भाने कर्मचारी व ठेवीदार यांनी साखळी उपोषण सुरू केले असून उपोस्नाचा आज दहावा दिवस असून आज उपोषण मंडपाला शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात उपोषणाला पाठिंबा दिला असून. या वेळी उपविभागीय अधिकारी मार्फत विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे याना निवेदन देण्यात आले, यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते. तानाजी सहारे. निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे. केवलसिंग जुनी, नितीन लोणारे. संजय वाकडे. समीर बल्की. सुनिल हिंगणकर. रोहन नन्नावरे. कृष्णकुमार टाँगे उपस्थित होते.