Breaking News

मुलीच्या विवाहासाठी शुभमंगल, सामुहिक नोंदणीकृत विवाह योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 04: जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर, निराधार, परित्यक्त्या, विधवांच्या मुलींचा विवाहाकरीता शुभमंगल, सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना जिल्हा नियोजन विकास समिती यांच्याकडून मिळणाऱ्या निधीतून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वधूच्या कुटुंबाचे वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा रुपये 1 लाख इतके राहील. अशा कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रतिजोडपे रु. 10 हजार एवढे अनुदान शासन निर्णयातील विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते.

शुभमंगल, सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत, सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. संस्था नोंदणी अधिनियम 1860, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत संस्थामार्फतच शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाहाचे आयोजन करण्यास परवानगी राहील.

या योजनेअंतर्गत सामूहिक विभागाचे आयोजन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 5 ते 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील. 100 जोडप्याच्या वर समावेश असलेल्या विवाह सोहळ्यासाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. एका स्वयंसेवी संस्थेने वर्षातून दोनदाच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येईल. त्यापेक्षा जास्त विवाह सोहळे आयोजित केल्यास त्यासाठी कोणतेही शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात सामील सर्व जोडप्यांची कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान 1 महिना अगोदर अटी व शर्तीच्या अधीन राहून महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्जासह सादर करणे आवश्यक राहील.

याशिवाय सुधारीत शुभमंगल, सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करून सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या वधू लाभार्थींना 10 हजार इतके अनुदान जिल्हा नियोजन विकास समिती यांच्याकडून प्राप्त निधीतून देण्यात येते. तसेच सदर योजनेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात भेट द्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण …

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved