13 दिवस धम्म सहल करनारे प्रवासी खानगाव वासीय महीला पुरुष नागरीका॓चा अभिनव उपक्रम
चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथील चालकाचा केला सत्कार.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-वाहन म्हटले की चालक आलेच. चालक हे संपुर्ण जोखीम पत्करून प्रवाश्यांना बाहेर राज्यातील देशात भ्रमण करून सुखरूप घरी पोहचवितात. परंतु कुणीही चालकाचे आभार मानत नाहीत परंतु चिमूर तालुक्यातील खानगाव येथील महीला पुरुष नागरीका॓नी खासगी वाहनाने 13 दिवस धम्म सहल प्रवास करून सुखरूप घरी पोहचविल्या बदल मानवतेची जाणीव ठेवून वाहन चालकाचे शाल श्रीफळ देऊन नुकताच सत्कार केला.जानता राजा टुर अॅन्ड ट्रावल्स मध्ये नेहमी आपल्याला पहावयास मिळाल्याने वाहनचालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहॆ.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात मानव हा पर्यटन किंवा इतर अनेक कार्यासाठी राज्यात परराज्यात भ्रमण वाहनाने करीत असते आणि अगदी कमी वेळात आपले कार्य पूर्ण करते ही सर्व किमया वाहनाचा चालक करीत असतो याकडे कुणीही लक्ष देत नाही काम पूर्ण झाले की त्याला मोबदला दिला जातो परंतु बाहेर देशात तब्बल 13 दिवसाचा हा एवढा मोठा प्रवास चालक आपले घरदार परीवार सोडुन गाडीत असनारे प्रवाशी आपले मायबाप आपला परीवार समजुन आपल्या जोखिमीने कुठलाही धोका न होऊ देता पूर्ण करतो परंतू कुणीही चालकाकडे लक्ष देत नाही पण चिमुर तालुक्यातील खानगाव या गावातील महीला पुरुष नागरीका॓नी मानवतेची एक झलक दाखवीत धम्म सहल सारनाथ बुद्धगया, नेपाल, आग्रा अश्या अनेक राज्य व नेपाल व दुसऱ्या देशातुन सुखरूप घरी परतल्यावर चालकांनी वाहनात दिलेली सेवा व उत्कृष्ठ मार्गदर्शन केले याची दखल घेत वाहन चालक विनोद रामटेके शिवणपायली यांचा सत्कार केला.
या सत्कार करण्याची जिल्ह्यातील हा जानता राजा टुर अॅन्ड ट्रावल्स च्या वाहन चालकाचा दुसरा उपक्रम आहे.या पुर्वी वरोरा तालुक्यातील टेंमूर्डा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचसह संपुर्ण ग्रामपंचायत कमिटीने जानता राजा टुर अॅन्ड ट्रावल्स नेरी चे वाहन चालक अरविंद वाघाडे मोठेगाव या॓चा सुध्दा सत्कार केला होता.तर सहा महीन्याच्या आत अनेक राज्याबाहेर देशातला प्रवास सुखरुप आनंदमय झाला म्हनुन खानगाव वासीय नागरीका॓नी विनोद रामटेके या॓चा शाल व श्रीफळ देऊन नुकताच सत्कार केला या अनोख्या उपक्रमामुळे वाहनचालकात आनंदाची लहर निर्माण झाली आहे सदर वाहन चिमूर तालुक्यातील जनता टूर्स आणि ट्रॅव्हल नेरी येथील असून वाहन चालक- मालक नेहमीच अशी सेवा देण्यास तत्पर असून गेल्या अनेक वर्षांपासून आतापर्यंत आम्ही प्रवाश्या॓चे मन जिंकतच आलोत असे जानता राजा टुर अॅन्ड ट्रावल्सचे मालक प्रवीण वाघे यानी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.