Breaking News

स्वस्थ धान्य दुकानात गोरगरीब लाभार्थ्याची गैरसोय

सहा तास ताटकळत ठेऊन,धान्य दिले नसून घरी परत जा अश्या शब्दात कर्मचाऱ्यांची वागणूक

दर अर्ध्या तासाणे जवळच असलेल्या भट्टीत ठंड पाणी प्यायला जाणे अशे अनेक कारणे सांगून ग्राहकांची हेळसांड,कारवाईची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/नेरी:- चिमूर तालुक्यातील नेरी येथे प्रायमरी क्रेडिट मर्या सहकारी संस्थेत स्वत धान्य दुकान वितरण प्रणाली असून गोरगरीब जनतेला लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिल्या जाते दि 12 जूनला सकाळी 6 ते 7 वाजता पासून लाभार्थी महिला पुरुष( राशन) धान्य घेण्यासाठी आले असता बोटावर मोजण्या इतक्या लोकांना धान्य देण्यात आले मात्र अनेक लाभार्थ्यांना ताटकळत ठेवून कुणालाही धान्य वितरित केले नाही विचारले तर मशीन खराब झाली, वेळ लागेल असे अनेक कारणे सांगून हुसकावून लावीत होते आता मिळणार नाही 3 वाजता या अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे लाभार्थी महिला पुरुष वैतागून गेले असून ही हुकुशाही असल्याचे बोलले जात आहे.

असे असतांना संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी शासनाने गोरगरीब जनतेला जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून देत असते, प्रत्येक महिन्याला धान्याचे वितरण केले जाते यासाठी सकाळीच शेतकरी गोर गरीब जनता धान्य दुकानात हजेरी लावत असतात लवकर धान्य घेऊन आपल्या रोजीरोटी जावे हा मानस ठेवून रांगेमध्ये उभे राहतात परंतु नेरी येथील प्रायमरी क्रेडिट सहकारी संस्थेत कर्मचाऱ्यांच्या मनमर्जी कारभारा मुळे सकाळपासून आलेले लाभार्थी हे ताटकळत उभे होते धान्याची विचारणा केली तर कर्मचारी बेजबाबदार कारणे सांगून लाभार्थ्या परत पाठवीत होते.

यामुळे सकाळी पासून उपाशी तापासी धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना गैरसोयी चा सामना करावा लागत असे तसेच कुणाला दुपारनंतर या असे सांगून दर अर्ध्या तासाणे जवळच असलेल्या भट्टीत ठंड पाणी प्यायला जाणे त्यामुळे जनतेत कर्मचाऱ्यांच्या या वागणुकी विरोधात आक्रोश निर्माण झाला त्यामुळे अनेक लाभार्थी हे आजच्या रोजीरोटी पासून वंचीत झाले असून त्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा अश्या उर्मट कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून संस्थेवर सुद्धा कारवाई करावी करावी अशी मागणी महिला पुरुषा नागरिक यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved