Breaking News

गटविकास अधिकारी तसेच कृषी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करा

काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

बदली झालेले कर्मचारी अजुनही त्याच जागेवर – कोणाच्या आशिर्वादाने ?

चिमूर पंचायत समिती येथील प्रकार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-जिल्हा परिषद चंद्रपूर कृषी विभाग मार्फत प्रशासकीय बदली दिनांक.०४/०८/२०२० ला काढण्यात आली. यामध्ये चिमूर पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कुमारी.सरोज चं सहारे यांची बदली पंचायत समिती बल्लारपूर येथे करण्यात आली व बदली आदेशानुसार (१) बदली झालेल्या कर्मचारी यांनी प्रशासकीय सबबीखाली बदली झाली असून पदस्थापणेच्या स्थळी रुजू होण्यास पदग्रहन अवधी व बदली प्रवास भत्ता अनुज्ञेय राहील.(२) बदली झालेल्या कर्मचाऱ्यास या आदेशाचे दिनांक.०४/०८/२०२० ला माध्यानानंतर पासून नवीन स्थळी रुजू होण्यास्तव कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे लागेल रुजू न झाल्यास त्यांचे वेतन व भत्ते अथवा इतर कोणतेही देयके बदलीपुर्वी वा बदलीनंतर कार्यरत पंचायत समिती व त्यांच्या कार्यालयातून अदा करता येणार नाही. (३) बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी विहित मुदतीचे आत रुजू होणे बंधन कारक राहील.

रुजू होण्यास टाळा – टाळ केल्यास किंवा बदली रद्द करून घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचा राजकिय दबाव आणल्यास किंवा असा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा ( वर्तणूक ) नियम १९६७ मधील नियम ६ (५) चा भंग केला असे गृहीत धरून संदर्भीय शासन निर्णयातील परिशिष्ट – प्रकरण मधील ८ (१) मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरेल असे नियम असतांना सुद्धा चिमूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश राठोड यांना हा सर्व प्रकार माहित असतांना सुद्धा त्याच ठिकाणी कृषी अधिकारी पदावर कु.सरोज चं सहारे यांना चिमूर पंचायत समिती येथे २ वर्षे ठेवून अजूनही त्याच ठिकाणी त्याच पदावर नियमबाह्य पध्दतीने ठेवले आहे.

शासकीय नियमानुसार शासन निर्णय याचे उल्लंघन करीत जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ६ (५) परिशिष्ट – प्रकरण मधील ८ ( १) चा भंग केला आहे. म्हणून या गट विकास अधिकारी राजेश राठोड तसेच कृषी अधिकारी कु.सरोज चं सहारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून आजपर्यंत ची देण्यात आलेली वेतन व भत्ते याची संपूर्ण रक्कम परत शासनाच्या खात्यात जमा करावे व निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved