Breaking News

सायबरचा नवीन “पिंक” विळखा लोकांनो धोका यातला ओळखा – अॅड.चैतन्य एम. भंडारी

सायबर अवेयरनेस फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या तर्फे आवाहन

प्रतिनिधी जगदीश का. काशीकर 
मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-आजकाल अनेकांना व्हाट्स अप वर मेसेज येत आहेत की, व्हाट्स अप चे नवीन व्हर्जन आले असून तुमचे व्हर्जन अपडेट करा त्यानंतर तुमच्या व्हाट्स अपचा रंग गुलाबी (आकर्षक) असा होईल तसेच इतरही अनेक फीचर्स त्यात आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल.आणि असे सांगत पुढं जाऊन ते लोक असेही भासवतात की हि व्हाट्स अप ची ऑफिशियल वेब वरून पाठवलेली लिंक व मेसेज आहे त्यामुळे काळजी करू नये ! फक्त सोबतच्या लिंक ला क्लिक करून पुढील प्रोसिजर पूर्ण करा” आणि तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुमचा व्हाट्स अप पिंक होताहोता बॅकग्राउंडला मात्र तुमचा मोबाईल हॅक होतो आणि तुमचा डेटा चोरीला जातो.

आता डेटा चोरीला जाणे म्हणजे काय ? हे टेक्नोसॅव्ही लोकांना कळेल पण सामान्य लोकांसाठी सांगतोय की, डेटा म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये जे जे काही साठवले असेल ते ते सगळे चोरीला जाते. गॅलरीमधील फोटो, कुणाबरोबर केलेले चॅटिंग, बँकिंग डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर लिस्ट असं सगळं सगळं चोरीला गेल्यावर काय धोका होऊ शकतो हे लक्षात आलंच असेल. तुमचे फोटो वापरून (मॉर्फिंग करून) नंतर तुम्हालाच ब्लॅकमेल केलं जाऊ शकत.

तुमच्या चॅटिंग मधील काही चॅट अर्धवट असे कट घेऊन तुम्हालाच नंतर घाबरवलं जातं. कारण भावनेच्या भरात कधीकधी आपण बरेच काही मित्राजवळ मैत्रिणीजवळ बोलून गेलेलो असतो ते सगळं अशा हॅकरसाठी जणू पुरणपोळी असते. त्याद्वारे ते तुम्हाला लुटू शकतात. आणि अजून एक म्हणजे, हल्ली टेलिमाकेर्टिंग साठी कंपन्यांना अधिकाधिक कोणताच नंबर्स हवे असतात. त्यांना तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्टस विकले जातात हॅकर कडून  असं हे सगळं धोकादायक आहे.आजकाल लोकांना सतत नवीन काहीतरी हवं असत. सतत डीपी बदलणे, स्क्रीन सेव्हर बदलणे, इतकंच काय पण मोबाईलचे कव्हर सुद्धा बदलणे हे अनेकजण करतात.हीच मानसिकता ओळखून हॅकर्स लोकांनी आता हा नवीन सापळा रचला आहे. नाविन्याची हौस असावी पण ती इतकीही नसावी की आपणच गोत्यात यावे.

तर मंडळी,व्हाट्स अप तर्फे अधिकृत असं काहीही पिंक व्हर्जन आलेलं नाहीय. त्यामुळे असं कुणी मेसेज करून कळवत असेल तर त्याला एन्टरटेन करू नका. थेट ब्लॉक करा आणि त्या नंबरची तक्रार त्वरित १९३० या नम्बरवर करा. तसेच समजा तुमच्याच एखाद्या मित्राकडून असा मेसेज आला असेल तर त्यालाही सावध करा. कारण असा मेसेज मित्राकडून जर आला असेल तर मग त्याचा फोन ऑल रेडी हॅक झालेला असतो. त्यामुळे त्यालाही सावध करा.सावध राहा सतर्क राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved