जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 13 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मॉडेल करीअर सेंटर यांच्य संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित पंतप्रधान शिकाऊ रोजगार मेळाव्यातून 29 उमेदवारांची निवड करण्यात आली.
यात लक्ष्मी अग्नी कंपनीच प्रा. लिमि यांनी 14 उमेदवार, पुणे येथील टॅलेनसुते सर्विसेस यांनी 7, झहिराबाद येथील महिंद्रा ॲन्ड महिंद्रा यांनी 3, चंद्रपूर येथील अशोक ले-लॅन्ड शो रुम यांनी 2 तसेच महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेस यांनी 3 उमेदवार असे एकूण 29 उमेदवारांची निवड केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, प्रमुख अतिथी म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली डहाट यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी येरमे म्हणाले, आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी करावा. तसेच उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी. विशेष म्हणजे उमेदवारांनीही नोकरीसाठी बाहेर जाण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रणाली डहाट म्हणाल्या, उमेदवारांची जन्मभुमी आणि कर्मभुमी एक असू शकत नाही. परजिल्ह्यात जावून नोकरी करण्याचे सामर्थ्य ठेवावे तसेच काम करण्याचे तयारीसुध्दा ठेवावी.
प्रास्ताविकातून एन.एन. गडेकर यांनी शिकाऊ मेळाव्याविषयी माहिती दिली. संचालन मेघा दोरखंडे यांनी तर आभार मुकेश मुंजनकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे श्रवण कुमार, सुवर्णा थेरे, योगेश काळे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एस.जी.गभणे,माकोडे यांच्यासह 144 उमेदवार उपस्थित होते.