
सेवानिवृत्त महसुल लिपिक घेतोय पेन्शन आणि जनतेला देतोय टेन्शन
उपविभागीय अधिकारी यांना कांग्रेस पार्टीचे सरचिटणीस विलास मोहिणकर यांनी दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय जवळील वॉटर फिल्टरला लागुन असलेली सुप्रसिद्ध उमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची उचल करून केशव धारणे सेवानिवृत्त महसुल लिपिक यांचे शेतातून दैनंदिन प्रती ट्रॅक्टर मालकाकडुन आर्थिक व्यवहार करुन रेतीची वाहतुक करु देत आहे. या ट्रॅक्टर मुळे रात्रीच्या वेळी शहरातील जनतेची कर्कश अशा आवाजाने झोप उडाली आहे.
ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजामुळे जनतेला रात्रीची झोप न घेता आल्याने जनतेला टेन्शन येत असुन शासनाचा महसुल बुडविण्यास सेवानिवृत्त महसूल लिपिक केशव धारणे कारणीभूत ठरत आहे. यामुळे या उमा नदी पात्रातून कोट्यावधी रुपयाची रेती चोरीला गेली आहे व दैनंदिन रात्रीला १५ ते २० ट्रॅक्टर अजुनही केशव धारणे यांच्या आशिर्वादाने रेती चोरी करीत आहे. या अगोदरही यांच्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या.
परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत सहकार्याची भूमिका गाजवुन यांच्या शेतात नेहमी उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांच्या पार्ट्या होत होत्या. यामुळे शासनही यास जबाबदार असुन योग्य ती चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना विलास मोहिणकर कांग्रेस पार्टीचे सरचिटणीस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.