Breaking News

‘माझ मत माझा अधिकार’ 13 मे रोजी मतदान

लक्षात ठेवा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत

बाकीची काम त्याच दिवशी करायला जावू नका कारण तुम्ही मतदान करून देशावर उपकार करत आहात, हे माहीत आहे. कारण तुम्ही फार कामाची माणसं आहात, म्हणून काही गोष्टींची आठवण करून देत आहे.

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

1) शेतात कोणतंही काम काढू नका.
2) सासरवाडीत आमरस खायला जावू नका. कारण फुकट मिळालं की जायची फार हौस आणि सवय आहे.
3) माझ्या जातीचा उमेदवार म्हणून मतदान करू नका. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करून मतदान करा.
4) जातीचा अभिमान रोटी बेटी व्यवहार करताना बाळगा, बिनकामी जातीच्या नेत्यांचे ऐकून भावनिक होऊ नका. त्यांना तुमच्या जीवावर स्वतःची खळगी भरायची आहेत.
5) लोकसभेची निवडणूक सक्षम नेता निवडायची निवडणूक आहे. कोणाला तरी धडा शिकवतो, म्हणून मतदान करू नका.
6) आपल्या घरातील, आजूबाजूच्या लोकांना उत्साहात मतदान करायला सोबत घेऊन जा, घरकोंबड्या सारखे घरात बसू नका.
7) मतदानाला जाण्यासाठी कोणी निमंत्रण देणार नाही, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. मला कोणी विचारले नाही, मला कोणी गाडी पाठवली नाही, मला कोणी मान सन्मान दिला नाही, मी खूप मोठा माणूस आहे, हे खूळ डोक्यात असेल तर आजचं काढून टाका.
8) तुम्ही जबाबदारीपासून पळू नका, ऊन आहे, हे कारण सांगू नका. फुकट रेशनसाठी भर उन्हात लाईन लावू शकता. लग्न मंडपात तासनतास जावू शकता. ऊनामुळे तुमचे कोणतेही काम अडत नाही, फक्त मतदान करताना फार कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणू नका. तुम्ही किती कामाचे आहात, हे सर्वांना माहीत आहे. बिनकामाची कारण सांगून घरात दडून बसू नका, मतदानाला बाहेर पडा. मतदान करा.
9) टिव्ही समोर बसून राजकीय विश्लेषण करू नका. हे माजले आहेत, यांचा उन्माद वाढला आहे, असले विषय इतर वेळी चघळत बसता, तसे जाऊन मतदान करून या. तुम्हाला देशाची काळजी वाटत असेल, घर आणि घरातील माणसं सुरक्षित रहावीत असे वाटत असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही बोलवायला येणार नाही.
10) एकीकडे मोठ मोठ्या गप्पा मारून हजार दोन हजार रुपयाची अपेक्षा बाळगू नका. ही निवडणूक वार्डाची नाही. तेव्हा रोटी, बोटी आणि चपटीची वाट पाहू नका. ती निवडणूक अजून लांब आहे.
11) आपल्या जिल्ह्यात, शहरात अजून पर्यंत तरी ऊन लागून कोणी दगावले नाही. तेव्हा ऊनाचे कारण सांगून घरी बसू नका. तुम्ही सुज्ञ आहात, जाणकार आहात. 7 तारखेला मतदान केंद्रावर जावून मतदान करून या. कोणतेही कारण सांगू नका. एक दिवस सर्व कामांना सुट्टी द्या, वाजत गाजत मतदान करा. दुसऱ्यांना मतदान करायला सांगा. काही गोष्टी कडवट वाटल्या असतील पण सांगणे आवश्यक आहे, यासाठी सांगत आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved