Breaking News

आधार कार्डवर फोटो दुसऱ्याचा तरीसुध्दा शाळेत मिळाला प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका अंतर्गत येत असलेल्या विरव्हा येथे जिगल जिवन सावसाकडे नामक सात वर्षीय चिमुकल्याच्या आधार कार्डवर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून शाळेतही त्याला याच आधार कार्डवर प्रवेश सुद्धा मिळाला. यावरून शिक्षक किती कार्यतत्पर आहे हे दिसून येत आहे.

जिगलचा जन्म चिमूर तालुक्यात शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१५ ला झाला असून आईचे माहेर शंकरपूर पासून जवळच असलेल्या शिवरा येथील आहे. शंकरपूर येथे आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये जिगलचे आधार कार्ड काढले. आधार कार्ड घरी आले तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जिगलचा आधार कार्ड वर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसल्याने सगळे चक्रावले. चूक लक्षात आली असता जिगलच्या आईने अपडेट करण्याच्या घोळामध्ये सात वर्षांपासून मुलाच्या आधार कार्डवर देवेंद्र फडणवीसांचाच फोटो आहे.

तर त्याच आधार कार्डवर शाळेतही प्रवेश घेण्यात आला. एरवी शाळेत प्रवेश घेताना शिक्षकांकडून सर्व कागदपत्रे तपासूनच प्रवेश दिला जातो मात्र जिगलच्या आधार कार्ड वरील फोटो दुसरा असतांना प्रवेश दिलाच कसा ? यावरून तेथील शिक्षकांची कार्यतत्परता दिसून येत असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तब्बल सात वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने मात्र सर्वत्र याची चर्चा होत आहे. तर आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी मुलाच्या आईने आधार केंद्रामध्ये चकरा मारणे सुरु केले असल्याचे कळते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

रस्ते अपघात टाळण्यासाठी वडकी पोलीस स्टेशन येथे हेल्मेट लकी ड्रॉ

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * कायद्याचे धाकाने नको तर स्वतः ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved